ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 22 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत सकाळपासूनच पाऊस सुरूच, पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर वाहनांचा वेग मंदावला, लोकल वाहतुकीवरही परिणाम
मुंबईतल्या सात धरणांमध्ये सरासरी ४७ टक्के पाणीसाठा, तानसा धरण ८४ टक्के तर मोडकसागर ६५ टक्के भरलं
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यातले ८४ बंधारे पाण्याखाली, पूरस्थिती पाहून शाळा सुरु ठेवण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना
भंडारा जिल्ह्यातल्या आसगाव आणि ओपारा जिल्ह्याला पूराच्या पाण्याचा विळखा, ओपाऱ्यात १०० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी,गावाचा संपर्कही तुटला..
जुलै महिन्याची 22 तारीख उजाडली तरी उजनी धरण कोरडंच, धरणात सध्या उणे २२ टक्के पाणीसाठा
मविआच्या नेत्यांना ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार, राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान
अमित शाहांचे शरद पवारांवरील आरोप निराशा आणि वैफल्यातून, संजय राऊतांची बोचरी टीका
शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार, आरक्षणाच्या प्रश्नावर काय भूमिका मांडणार याची उत्कंठा, दुपारी दोन वाजता होणार बैठक...