ABP Majha Headlines : 7 PM : 27 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement


ABP Majha Headlines : 7 PM : 27 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश, जरांगेंचा बोलविता धनी कोण, हे शोधणार, फडणवीसांचा इशारा 

कर नाही त्याला डर कशाला, एसआयटी चौकशीच्या आदेशावर जरांगेंची प्रतिक्रिया, चौकशी एकतर्फी नको सगळ्यांची करा, जरांगेंची मागणी

मनोज जरांगेंची भाषा राजकीय आहे...मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं शोभतं का?, जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी

राजेश टोपेंच्या कारखान्यावर जरांगेंच्या आंदोलनाचं षडयंत्र रचण्यात आलं, दरेकरांचा आरोप, तर एक टक्काही दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, २६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू, मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात फायदा होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी अंतरिम अर्थसंकल्प अजित पवारांकडून सादर..अर्थसंकल्पात ६ लाख ५२२ कोटींची तरतूद.. 

अयोध्या, श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram