ABP Majha Headlines : 7 PM : 26 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 PM : 26 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार, उपचारांसाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये

लिमिटच्या बाहेर गेला की मी त्याचा कार्यक्रम करतो, नाना पटोलेंकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अतिशय सूचक वक्तव्य, जरांगेंना गर्भित इशारा दिल्याची चर्चा

भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, भाजप आमदारांना वरिष्ठांच्या सूचना

संसदेत मी पतीला घेऊन जात नाही, खासदार मी आहे, मतंही माझ्याकडे पाहूनच द्या, सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना सणसणीत टोला 

बारामती लोकसभेच्या तयारीत स्वतः शरद पवार लक्ष घालणार, येत्या रविवारी सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेणार

विकासकामे वेगाने मार्गी लागावीत या उद्देशाने वेगळी भूमिका, राज्यातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात अजित पवारांचं स्पष्टीकरण, विकासाची ब्लू प्रिंट आणणार असल्याचीही ग्वाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram