ABP Majha Headlines : 11 PM: 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा
खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपनं केलेल्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर, मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल
महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण तयार केल्याबद्दल मोदींचे आभार, शरद पवारांची मिश्कील प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेतला विजय ही तर सुरुवात.
महाविकास आघाडीत मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणी नाही, निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा...पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण...
ठाण्यातील मुंब्रामध्ये सिमेंट मिक्सर वाहनाचा अपघात, एकाचा मृत्यू, ७ मुलं जखमी, सिमेंट मिक्सर वाहन
सोसायटीच्या आवारात कोसळलं
मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचं जवळपास ९० टक्के काम पूर्ण,
मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास जुलैअखेर नंतर
टी-ट्वेन्टी विश्वचषकातील भारत-कॅनडा सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना एकेक गुण, भारताचं गटातील अव्वल स्थान कायम, आता लक्ष सुपर एटमधील लढतींकडे
ठाण्यानजिकच्या मुंब्रा परिसरात एका सिमेंट मिक्सर वाहनाचा विचित्र अपघात होऊन, त्या अपघातात एका तरुणाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. हे सिमेंट मिक्सर वाहन एका सोसायटीच्या आवारात कोसळून हा अपघात घडल्याचं समजतं. त्या अपघातात सात मुलंही दुर्दैवीरित्या जखमी झाल्याचं समजतं. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून,
अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड हेही घटनास्थळी पोहोचले आहेत.