ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 AM : 11 June 2024 : Maharashtra News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढील चार तासांत मुंबईसह कोकण मराठवाड्यात पावसाचा वेधशाळेचा इशारा... विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता,
उजनी धरणाची पाणीपातळी ४ टक्क्यांनी वाढली तर जोरदार पावसामुळे पंढरपुरातील येवती तलाव दोन दिवसात ८० टक्के भरला
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील लेंडी नदीला पूर तर जालन्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप
एस. जयशंकर आणि अश्विनी वैष्णवांनी स्वीकारला पदभार, परराष्ट्रमंत्रीपदी एस. जयशंकर पुन्हा रूजू, तर रेल्वेचं इंजिन अश्विनी वैष्णवांकडे...
नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक खातं, मुरलीधर मोहोळ सहकार खात्याचे राज्यमंत्री, रक्षा खडसेंना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद, तर प्रतापराव जाधवांना आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार
मणिपूरमधली हिंसा थांबवणं गरजेचं, नागपूरमधील भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांची मोदी सरकारला सूचना
लोकसभेचे निकाल असे का लागले यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पडत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, प्रक्षोभक विधानांवरून सर्वच पक्षांवर ताशेरे
कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गटात काहीशी खदखद, श्रीरंग बारणे आणि अण्णा बनसोडेंनी व्यक्त केली नाराजी
मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य.