ABP Majha Headlines : 07 AM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर, बाप्पाच्या दर्शनानंतर जे.पी नड्डा यांची फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक, महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार
मुंबई विधानसभेसाठी भाजपनं कंबर कसली. मुंबईतल्या प्रत्येक मतदार संघावर आता भाजपची असणार तिहेरी नजर.
मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फीजिबिलिटी रिपोर्ट मागवल्याची माहिती
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत, विधानसभेच्या तोंडावर हैदराबाद गॅझेटसाठी विशेष अधिवेशनाची शक्यता
मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप मोबाईलमध्ये होती, सीडीबाबत खडसेंचा गौप्यस्फोट, क्लिप डीलिट कशी झालं याचं कोडं उलगडत नसल्याची माहिती
जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब
आनंदाच्या शिध्यावरुन काँग्रेसचा सरकारवर निशाणा. गणेशोत्सव संपत आला तरी शिध्याचा पत्ताच नाही काँग्रेसचा आरोप.