Buldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव
बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव, दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नसल्याची सर्व मंडळांची भूमिका. त्यामुळं सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणूका थांबून.
काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात वाद झाला होता..
त्यानंतर झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झालं तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक गणेशभक्त ही जखमी झाले..
त्यानंतर जळगाव जामोद शहरातील पंधरा गणेश मंडळ हे दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नाही या भूमिकेत आहेत अद्यापही जवळपास 15 गणेश मंडळ हे जळगाव जामोद शहरात थांबून आहेत अद्यापही विसर्जन झालेल्या नाही जळगाव जामोद शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र गणेश विसर्जन न झाल्यामुळे जळगाव जामोद शहराच्या मुख्य रस्त्यावर गणेश मंडळांच्या मूर्ती थांबून आहे.