ABP News

Aambas Danve PC : गणपत गायकवाडांच्या मतदानावरुन वाद पेटला, अंबादास दानवेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Continues below advertisement

Aambas Danve PC : गणपत गायकवाडांच्या मतदानावरुन वाद पेटला, अंबादास दानवेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई :भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या मतदानावरुन( Maharashtra Vidhan Parishad Election 2024) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Davne) यांनी हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचं म्हटलं. सत्ता कुठंपर्यंत पोहोचते, न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे दिसून येतं. अनिल देशमुख यांच्यावर आरोप होते. गणपत गायकवाड यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी मारताना सगळ्या जगानं बघितलं आहे. अनिल देशमुख यांना मतदानाला येऊ दिलं नव्हतं. गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री अनिल देशमुख (ओ) यांनी देखील यावरुन हल्लाबोल केला आहे. 


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram