Aaditya Thackeray : यशवंत जाधव ते नाणार प्रकल्प, आदित्य ठाकरेंनी मांडले महत्त्वाचे मु्द्दे

Continues below advertisement

Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी (Nanar Refinery) प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आजच्या दौऱ्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना नाणार प्रकल्पासंदर्भात आदित्य ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं. यावेळी त्यांची सकारात्मक भूमिका दिसून आली आहे. प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेऊ, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरित आयकर विभागाला आढळलेल्या 'मातोश्री' उल्लेखावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, "नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको, या सातत्यानं होणाऱ्या मागणीमुळं आपण तिथून तो हलवला आहे. लोकवस्ती असल्यानं नाणारमधून बाहेर हलवण्यात आलं आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन." 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram