Pune : पुण्याच्या बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकाराच्या घटना, PMP वाहकाकडून मुलीचा विनयभंग

Continues below advertisement

 पुण्याच्या बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकाराची एक नव्हे तर तीन घटना घडल्या आहेत. बंडगार्डन भागात  एका पबमध्ये इव्हेंट मॅनेजर असलेल्या तरुणीची एका टोळक्यानं छेड काढली.. काल मध्यरात्री या पबच्या पार्किंगमध्ये काही सहकाऱ्यांसोबत ही तरुणी आली असता तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी आक्षेपार्ह वर्तन केलं... आणि तरुणीसोबत असलेल्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली, दुसऱ्या घटनेत एका पीएमपी वाहकानं १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग केलाय. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे... तर तिसरी घटना १३ मार्चला घडलेली आहे.. एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये १९ वर्षीय तरुणीसोबत अश्लील वर्तन करत तिला मारहाण करण्यात आली... या प्रकरणी पोलिसांनी ओहनसिंग सहानी नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram