OBC Reservation: ओबीसी राजकीय आरक्षणावर आज विधिमंडळात विशेष विधेयक येणार ABP Majha

Continues below advertisement

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरु होतोय. मलिकांचा राजीनामा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर सभागृहात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गाजण्याची चिन्हं आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून आज विधानसभेत विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. विधेयकात मध्यप्रदेश सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या फॉर्म्युल्याचाही विचार केला जाणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती. या विधेयकामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार का याकडं लक्ष लागलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram