9 Second News : 9 PM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 03 Oct 2024 : ABP Majha

Continues below advertisement

पुण्यात स्कूल बस चालकाकडून 8 वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार, 45 वर्षीय चालकाला अटक, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 

पुण्यातील अत्याचार प्रकरण, वंचितच्या १५ ते २० कार्यकर्त्यांची स्कूल व्हेनवर दगडफेक, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.

घृणास्पद गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनचं वय १६ वरुन १४ वर आणण्याचा विचार, अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शाहांशीही चर्चा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वाढत्या गुन्हेगारीचा आढावा. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, गुंडूराव यांच्या वक्तव्यावर भाजप नेते अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया. काँग्रेस स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत नाही हे पुन्हा सिद्ध झाल्याचंही ठाकूर यांचं वक्तव्य.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ((राज्याचे माजी मुख्यमंत्री)) सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कौतुक. काँग्रेसची कोंडी. काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याची गरज, आत्मचरित्रात शिंदेंनी व्यक्त केलं मत.

पुण्यातल्या निगडीमध्ये राज्यस्तरीय बाजार समितींच्या परिषदेमध्ये अब्दुल सत्तारांवर घोषणाबाजी, कार्यक्रमास्थळी लावलेल्या फ्लेक्सवरील अब्दुल सत्तारांचे फोटोही काही सदस्यांनी फाडले, सत्तारांचा परिषदेतून काढता पाय

शिंदे गटाचे कल्याण शहाराध्यक्ष वामन म्हात्रेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला निकाल, बदालपूरमधील रेलरोकोच्यावेळी महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेंवर आरोप.

नांदेडमध्ये ठाकरे गट मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, उपशहर प्रमुख जखमी संतोष वडवळे यांच्यासह वडील आणि भावावर गुन्हा दाखल, घटनेआधी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram