100 HeadLines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स सुपरफास्ट ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना सामोरं जायचं, भाजप कोअर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला, खोट्या नरेटीव्हला काऊंटर करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्ती करणार.
महाराष्ट्र भाजपाची दोन दिवस पुण्यात बैठक, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता, १३ जुलैला प्रदेश पदाधिकारी, १४ जुलैला विस्तारित कार्यसमितीची बैठक.
माजी आमदार वसंत गिते यांच्या मुंबई नाका परिसरातील संपर्क कार्यालयावर मनपाची कारवाई, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई कशी होते, प्रथमेश गितेंचा सवाल.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत अभ्यागतांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी मर्यादित संख्येने प्रवेश मिळणार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा.
निकालही लोकसभेसारखे दिसतील, मोदींनी १८ सभा घेतल्या, १४ जागी पराभव झाला, जिथे जिथे मोदींच्या सभा झाल्या तिथे तिथे मविआचा विजय, शरद पवरांचा हल्लाबोल.
गणेश मूर्तिकारांना मोफत मध्ये शाडू माती उपलब्ध करुन देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा.
साऊथ कोरियाचा हुंदाई प्रकल्प पुण्यात येणार, गेल इंडिया कंपनी महाराष्ट्रात साडे चार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार, मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती.
३ वर्षात दाओसला कोण कोण गेलं, त्यांनी काय केलं, किती MOU झाले, कितींची अंमलबजावणी झाली याची श्वेतपत्रिका काढणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
सुरु करणार, सर्वधर्मातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करुन योजना सुरु करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.
राज्य सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ, महाराष्ट्राच्या जनतेने सरकारला आपली जागा दाखवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाल पटोलेंचा सरकारवर निशाणा.