Kolhapur DCM Ajit Pawar Speech Full : पाच लाखापर्यंत सर्व नागरिकांना खासगी रुग्णालयात मोफत उपचार

Kolhapur DCM Ajit Pawar Speech Full : पाच लाखापर्यंत सर्व नागरिकांना खासगी रुग्णालयात मोफत उपचार आज देशभर स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. देशातील सर्व नागरिकांच्या एकजुटीतून  स्वातंत्र्य आणि लोकशाही भक्कम करुया. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता मजबूत करण्याचा स्वातंत्र्यदिनी दृढनिर्धार करुया असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.  देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले. तसेच उत्कृष्ट कामगिरी, उल्लेखनीय सेवेबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला  राष्ट्रपती पदक, सेवापदक जाहीर झालेल्या राज्यातील पोलिस, अग्निशमन, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दलाच्या अधिकारी आणि जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola