Maharashtra Rain update : राज्यातील धरण क्षेत्रात कमी पाऊस, जलाशयांची पाणी पातळी 61.16 टक्के
राज्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत केवळ ४७ दिवस पाऊस पडलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस आजच्या दिवसापर्यंत ५६ मि.मी. कमी आहे.
राज्यात लघु, मध्यम आणि मोठी २ हजार ९९४ धरणे आहेत. या धरण क्षेत्रातही कमी पाऊस झाल्याने १४ ऑगस्टपर्यंत या धरणांतील जलाशयाची पातळी ही केवळ ६१.१६ टक्के आहे. गेल्या वर्षी हीच पातळी ७९.६३ टक्के होती. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक सोयाबीन आणि कापूस लावला आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस न झाल्यास शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे, पुढील दोन दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.