West Bengal Election Result : पोटनिवडणुकीत Mamata Banerjee विजयी, तृणमूलचा जल्लोष : ABP Majha
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
03 Oct 2021 03:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकाता : तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचली आहे. भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांच्यावर तब्बल 58 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा करायला सुरुवात केली असून ममता बॅनर्जींचे घर आणि पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.