Vaghnakha Britain : छत्रपती Chhatrapati Shivaji माहाराजांची वाघनखं ब्रिटनमधून परत आणणार?
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार करार करणार आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. ती परत देण्याबाबत ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी होकार कळवला आहे. संबंधित करार करण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य़मंत्री सुधीर मुनगंटीवार या महिन्याच्या शेवटी लंडनला जाणार आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर या वर्षीच ही वाघनखं भारतात परत आणण्यात येतील.
Tags :
Chhatrapati Shivaji Maharaj Britain Government Of Maharashtra Afzal Khan Vadh Vaghanakh Treaty Victoria And Albert Museum