Corona Celebrities: सौरव गांगुलीला डेल्टा व्हेरियंटची लागण, अभिनेत्री मृणाल ठाकूरही कोरोना पोझिटीव्ह
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा कोरोना अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. गांगुली यांचा ओमायक्रॉन रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी त्यांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलंय. सध्या त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. दुसरीकडे अभिनेत्री मृणाल ठाकूर हिलाही कोरोनाची लागण झालीय. सोशल मीडियावर पोस्ट करुन तिने याबाबतची माहिती दिलीय. काही लक्षणं जाणवल्यानंतर स्वतःला आयसोलेट केल्याची माहिती तिनं दिलीय.
Tags :
Corona Maharashtra Maharashtra Corona Mumbai Mumbai Corona Saurav Ganguly Corona Mumbai Mrunal Thakur Omicron