Mumbai Corona : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास शिवसैनिकांकडूनच हरताळ; मालवणी जत्रोत्सवात तुफान गर्दी
Continues below advertisement
मुंबई : एकीकडे मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावं आणि नववर्षाचं सेलिब्रेशन गर्दी करुन करु नये असं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचा विसर त्यांच्याच पक्षाला पडला असून अंधेरीमधील शिवसेनेच्या मालवणी जत्रोत्सवाला तुफान गर्दी झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना अशा गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी कशी मिळते, कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का असे सवाल विचारले जात आहेत.
Continues below advertisement