Ramnath Kovind on WFH: कोरोना काळात घरुन काम करणाऱ्या महिलांवर तिप्पट भार- राष्ट्रपती ABP Majha
Continues below advertisement
कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे नोकरी करणाऱ्या महिलांवर तिप्पट भार पडू लागला आहे, अशी चिंता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलीय. मनोरमा इअरबुकमध्ये राष्ट्रपतींनी तरुणांना लिहिलेलं पत्र प्रसिद्ध झालंय. त्यात राष्ट्रपतींनी हा उल्लेख केलाय. महिलांवर नोकरी आणि घरकाम या दोन्हींचं ओझं आहे. त्यात मुलंही घरूनच शाळा शिकू लागलीत. त्यांच्याकडे लक्ष देणं आणि त्यांची काळजी घेणं हे कामही आईवरच येऊन पडतं, असं राष्ट्रपतींनी म्हटलंय. पुरुषांनी आपल्या जोडीदाराचा थोडा भार हलका करावा, असा सल्लाही राष्ट्रपतींनी दिलाय.
Continues below advertisement