Priyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषण

Continues below advertisement

नवी दिल्ली : कधी त्यांचं नाव घेत नाही, कधी त्यांचं नाव तुमच्या सोयीसाठी धडाधड घेता, पण त्याच नेहरुंनी एचएएल, भेल, सेल, गेल, ओएनजीसी, एनटीपीसी, रेल्वे, आयआयटी, आयआयएम, तेल शुद्धीकरण कारखाने आणि सार्वजनिक उपक्रमांची स्थापना केली, अशा शब्दात खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी संसदेत हल्लाबोल केला. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संसदेत चर्चा करण्यात आली. यावेळी सरकारकडून बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेहरुंचा उल्लेख केला नाही. यानंतर विरोधकांनी शेम शेम म्हणत घोषणाबाजी केली. प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात नेहरुंचा धागा पकडत जोरदार पलटवार स्वतंत्र भारतामध्ये त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांची आठवण करून देत जोरदार पलटवार केला. 

सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का?

संसदेत संविधानावर झालेल्या चर्चेदरम्यान प्रियांका गांधी म्हणाल्या की, संविधानाने आजच्या सरकारला महिला शक्तीबद्दल बोलण्यास भाग पाडले आहे. केंद्र सरकार नारी शक्ती कायदा विधेयकाची अंमलबजावणी का करत नाही? आजची स्त्री 10 वर्षे वाट पाहणार का? प्रियाका म्हणाल्या की, तुम्ही पंडित नेहरूंचे नाव घेऊ नका. जिथे गरज असेल तिथे आपण नक्कीच घेतो. सत्ताधारी पक्षातील मित्र भूतकाळाबद्दल बोलतात. 1975 मध्ये काय झाले, नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला. तुम्ही काय करत आहात ते देशाला सांगा. तुमची जबाबदारी काय? सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का?

इंदिराजींनी बँका आणि खाणींचे राष्ट्रीयीकरण केले. काँग्रेस सरकारच्या काळात शिक्षण आणि अन्नाचा अधिकार मिळाला. जनतेचा विश्वास मिळाला. पूर्वी संसदेचे कामकाज चालायचे, तेव्हा महागाई आणि बेरोजगारीवर चर्चा होऊन काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. कोणतेही धोरण बनवले तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि भविष्याला बळकट करण्यासाठी बनवले जाईल. आजही संसदेचे कामकाज होऊ दिले जात नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram