PM Narendra Modi | पंतप्रधान मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला लॉकडाऊन, जागतिक परिचारिका दिवस तसंच इतर विषयांवर पंतप्रधान मोदी भाष्य करतील, अशी शक्यता आहे.
पंतप्रधानांनी कालच (11 मे) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेतही दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज मोदी लॉकडाऊनसंदर्भात घोषणा करणार याचीही उत्सुकता आहे.