Indo-China : चीनच्या नव्या संरक्षण कायद्यामुळे भारत-चीनमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
Continues below advertisement
भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव असताना चीननं सीमावर्ती भागांच्या संरक्षणासाठी नवा कायदा केला आहे. या कायद्यामुळे भारत-चीनमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडता पवित्र आणि अविभाजित असल्याचं चीनच्या या कायद्यात म्हटलंय. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, चीनच्या संसदेनं या कायद्याला शनिवारी मंजुरी दिली. 1 जानेवारीपासून हा कायदा लागू होणार आहे. त्यात सीमा सुरक्षा बळकट करणं, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सहाय्य करणं, सीमा भागातील लोकांना मदत करणं असे उद्देश आहेत. शेजारील देशांशी असलेल्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचा प्रस्तावही या कायद्यात आहे.
Continues below advertisement