Mumbai: लसीमुळे मुलं ओमायक्रॉनपासून किती सुरक्षित? 'या' लशीही शर्यतीत ABP Majha

Continues below advertisement

भारतात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झालाय. आता लहान मुलांसाठीच्या पहिल्या स्वदेशी लशीला डीसीजीआयने हिरवा कंदील दाखवलाय. १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या वापरला मंजुरी देण्यात आलीय. 
हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस १८ वर्षांवरील व्यक्तींना दिली जातेय. ओमायक्रॉन आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांनाही लवकरात लवकर लस मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीची लहान मुलांवर चाचणी करण्यात आली. आता ही लस लहान मुलांना देण्यास परवानगी देण्यात आलीय. १२ ते १८ वयोगटातील मुलांवर  या लशीच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआयने परवानगी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram