Jamnagar : मॉस्को ते गोवा विमानाचं गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडींग, विमानात बॉम्ब असल्याचा संशय
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 10:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरातमधून एक मोठी बातमी समोर येतेय. मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं. विमानात बॉम्ब असल्याच्या संशयामुळे जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं . बॉम्ब शोधक पथक तातडीने जामनगर विमानतळावर दाखल झालंय. या विमानात 244 प्रवाशी होते. मॉस्को वरून गोव्याला येणारं विमान गेल्या 9 तासांपासून जामनगर विमानतळावर आहे. विमानातून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं असून बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकाकडून तपास सुरु आहे.