Ladakh Pangong lake : पँगाँग तलावात चालवली कार; मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा ABP Majha

Continues below advertisement

अता बातमी पँगाँग मधील सौंदर्याला बाधा आणणाऱ्या एका बेजबाबदार पर्यटकांच्या व्हिडीओची.... भारत आणि चीन दरम्यान असलेला पँगॉन्ग सरोवर आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून पर्यटनासाठीही एक आकर्षक ठिकाण आहे. मात्र याच तलावात मद्यधुंद अवस्थेतील पर्यटक कार चालवतांनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ३ पर्यटक मद्यधुंद आवस्थेत आपली आलिशान कार पेंगॉन्ग तलावात चालवत मस्ती करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. इतकच नव्हे तर तलावात एका टेबलवर कोलड्रींग आणि मद्याच्या बाटल्याही ठेवल्याचं यात दिसून येत आहे. जिग्मत लडाखी नावाच्या ट्विटर हँडलवरुन सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडिओ पाहून नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. तरुणांवर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे.....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram