Pandharpur : कामदा एकादशीनिमित्त विठुरायाच्या गाभाऱ्यात द्राक्षांची सजावट, भाविकांची गर्दी
Pandharpur : आज चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशी.. आज कामदा एकादशीनिमित्त विठुरायाच्या गाभाऱ्यात द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे.. लक्ष्मी टाकळीमधील शतकरी संजय तिकोरे यांनी ७०० किलो द्राक्षांची सजावट करून आपली सेवा विठुराया चरणी अर्पण केली. तब्बल दोन वर्षांनंतर देवाच्या पायावर माथा टेकवून दर्शन सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच एकादशी आहे. त्यामुळे आज पंढरीत भाविकांचा ओघ वाढण्याचा अंदाज आहे..