INS विशाखापट्टणमच्या समावेशाने पाकिस्तान, चीनच्या उरात धडकी भरणार, भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार
मुंबई : स्वदेशी बनावटीची आयएनएस विशाखापट्टणम ही अत्याधुनिक युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत रविवारी मुबईत झालेल्या एका कार्यक्रमात ही युद्धनौका नौदलात दाखल झाली. यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. विशाखापट्टणम' ही विनाशिका माझगाव डॉकने तयार केली आहे.
बराक, ब्राम्होस, अॅन्टी सबमरिन, रॉकेट लॉन्चर अशा अनेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या आएनएस विशाखापट्टणममुळे शत्रूच्या उरात धडकी भरणार आहे. विशाखापट्टणमचे वजन तब्बल साडेसात हजार टन इतकं आहे आणि त्याची लांबी 164 मीटर इतकी आहे. कुठल्याही रडारमध्ये सहज टिपली जाणार नाही, हे 'विशाखापट्टणम'चे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
Tags :
INS Vishakhapattanam