Ladakh Highest Road : लडाखमधील रस्ता गिनीज बुकमध्ये, 19,024 फुटांवर बांधला मोटरेबल रस्ता
भारतीय सीमा रस्ते संघटनेनं त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय. सीमा रस्ते संघटनेनं लडाखमध्ये जगातील सगळ्यात उंचावरील गाड्या जाऊ शकणारा मोटरेबल रस्ता तयार केलाय. या रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालीय. हा रस्ता देशाच्या उत्तर सीमेवरील अति दुर्गम भागात लडाखच्या उमलिंगला येथे तयार करण्यात आला आहे. 19 हजार 24 फुट उंचावरील हा रस्ता भारतीय सीमा रस्ते संघटनेचं मोठं यश आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं याबाबतच प्रमाणपत्र सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांच्याकडे सुपुर्द केलं.