Mumbai Congress : भाई जगताप आणि झिशान सिद्धिकी यांच मानपमान नाट्य थेट दिल्ली दरबारी, काय आहे प्रकरण?
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची हायकमांडकडे तक्रार करण्यात आले आहे. मुंबई यूथ काँग्रेस अध्यक्ष झिशान सिद्धिकी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहीत ही तक्रार केली आहे. काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चादरम्यान जगतापांनी धक्काबुक्की केली आणि अपमानास्पद वागणूक दिली अशी तक्रार झीशान सिद्धिकी यांनी केले आहे.