#Covid अनेक देशात तिसरी लाट आल्याचं निदर्शनास, भारतात खबरदारी घेणं गरजेचं : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2021 09:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCoronavirus Today : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसागणिक घट होताना दिसत आहे. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 32 हजार 906 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत 4 लाख 10 हजार 784 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच, काल दिवसभरात 49 हजार 07 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे.