Airport Guidelines : आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांना दिलासा, अनेक नियम केंद्र सरकारकडून शिथिल
abp majha web team
Updated at:
10 Feb 2022 02:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंतरराष्ट्रीय विमान प्रवासासंदर्भातले अनेक नियम केंद्र सरकारनं शिथिल केले आहेत. नव्या नियमावलीनुसार 82 देशांमधून भारतात येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीसंदर्भात विकल्प देण्यात आलाय. 72 तासांच्या आरटीपीसीआर रिपोर्टऐवजी लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र अपलोड करण्याची मुभा प्रवाशांना देण्यात आलीय. सात दिवसांच्या होम क्वारंटाईनचा नियमही रद्द करण्यात आलाय. त्याऐवजी परदेशातून आलेल्या प्रवाशांनी 14 दिवस स्वतःचं निरीक्षण करावं असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलाय. विमानातल्या फक्त दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर टेस्टिंग करण्यात येईल. याशिवाय काही देशांं यापूर्वी अॅट रिस्क अर्थात धोकादायक असं वर्गीकरण करण्यात आलं होतं. ते देखील रद्द कऱण्यात आलंय.