Bollywood Drug Connection | बॉलीवूड ड्रग कनेक्शनचा तपास NCBकरत नसेल तर मुंबई पोलीस करतील-अनिल देशमुख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. एनसीबीने तपास सुरु केल्यानंतर या क्षेत्रातील अनेक मोठी नावे समोर आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने बॉलिवूडमधील आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनच्या तपासाची मागणी केली आहे. या संदर्भात एनसीबीला तक्रार केली आहे. मात्र, एनसीबीने तपास केला नाही तर चार ते पाच दिवसात महाराष्ट्र पोलीस तपास सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.