Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनधारकाना सवलतीचा हात, प्रति युनिट साडेचार रुपये ABP Majha
Continues below advertisement
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला हातभार लावण्यासाठी आता महावितरणनं मोठा निर्णय घेतलाय. वीजेची मागणी कमी असताना रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक वाहनांना स्वस्तात वीज पुरवली जाणार आहे. त्यासाठी प्रति युनिट ४ रुपये ५० पैशांची दर आकारला जाणार आहे. घरगुती वीजेपेक्षा हा दर कमी असल्यानं इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Continues below advertisement