Saina Nehwal | फुलराणीची कमळाला साथ... प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपात प्रवेश | ABP Majha
भारताची फुलराणी सायना नेहवाल आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दिल्ली मुख्यालयात सायनाचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी प्रचारही करणार आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये जन्मलेली सायनाचा समावेश जगभरातील उत्कृष्ट बॅडमिंटनपटूंमध्ये केला जातो. सध्या सायना जगभरातील आठव्या क्रमांकावर आहे.