CM Eknath Shinde Karnataka Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मंगळुरात जंगी स्वागत
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय रविवार पाहायला मिळणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही काँग्रेसच्या बाजूनं जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुक्काम ठोकून आहेत. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत... शिंदे भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. एकूणच आज कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे