Bharat Bandh | कृषी कायद्याविरोधात उद्या देशव्यापी बंदची हाक; देशातील 12 पक्षांचं भारत बंदला समर्थन
Continues below advertisement
नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Essential Commodities Act Central Govt. MOdi Govt. Farmer Bill India Farmer Narendra Modi Agriculture Bill Bharat Band Farmers Protest Reason Bharat Bandh News Bharat Bandh 2020 BJP Protest On Agriculture Bill India Bandh Bharat Bandh Farmer Agitation Farmer Protest