Corona Vaccine | कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्या : सीरम इन्स्टिट्यूट

Continues below advertisement

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं डीसीजीआयकडे केली आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने महामारी दरम्यान, विस्तृत स्तरावर वैद्यकीय गरजा आणि जनहित यांचा हवाला देत सीरमने कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. याआधी शनिवारी अमेरिकी औषध निर्माती कंपनी फायझरने केंद्र सरकारकडे भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे.

गेल्याच आठवड्यात फायझरला ब्रिटन आणि बहारीनने लसीकरणाला परवानगी दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये या लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. आता या कंपनीने भारतात लसीकरणासाठी तात्काळ परवानगी मागितली आहे. याला भारत सरकार कसा प्रतिसाद देतो ते पहावं लागेल. तसेच एसआयआयने आयसीएमआरसोबत एकत्र येऊन रविवारी देशाच्या विविध भागांत ऑक्सफर्डच्या कोविड-19ची लस 'कोविशील्ड'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचं परीक्षण केलं.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकृत सुत्रांनी माहिती दिली की, एसआयआयच्या अर्जाचा हवाला देऊन ते म्हणाले की, कंपनीने सांगितलं आहे की, क्लिनिकल परीक्षणाच्या चार डेटामध्ये हे समोर आलं आहे की, कोविशिल्ड कोरोनाची लक्षण असणाऱ्या रुग्णांमध्ये खासकरुन कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये खास प्रभावी ठरते. चारपैकी दोन चाचण्यांचा डेटा ब्रिटन आणि एक-एक भारत आणि ब्राझीलशी संबंधित आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram