Afghanistan crisis : 'मिशन काबूल'ला मोठं यश, काबूलमधून शेकडो भारतीय मायदेशी ABP Majha
काबूलमध्ये अडकलेले शेकडो भारतीय आज मायदेशी परतले आहेत... १६८ जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचं C-17 विमान गाझियाबादमधल्या हिंडन एअरबेसवर दाखल झालंय. भारतीय वायुदलाच्या या मोहिमेमुळं फक्त भारतीयांचीच नव्हे, तर अनेक अफगाण नागरिकांची देखील तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटका झाली आहे.. अनेक जण आपल्या लेकरा-बाळांसह आणि वृद्ध माता-पित्यांसह भारतात दाखल झाले आहेत.. विमानातून उतरताच अनेकांना अश्रू अनावर झाले.. दरम्यान अफगाणिस्तानातल्या दुशांबेमधून ७९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान सकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी दिल्ली विमानतळावर दाखल झालं.