Soldier Martyred Kashmir: काश्मीरच्या राजौरीत 5 जवान शहीद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSoldier Martyred Kashmir: काश्मीरच्या राजौरीत 5 जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये ५ सैनिक शहीद झालेत... ऑपरेशन त्रिनेत्रच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना सैनिक आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली... यात दोन सैनिक जागीच शहीद झाले... तर तीन सैनिकांचं उपचारा दरम्यान निधन झालं... ३ मेपासून राजौरीच्या कंदी जंगलात सैनिकाकडून दहशतवाद्यांचा शोध मोहीम सुरू करण्यात आलीय... जंगलात लपलेल्या दहशतवाद्याचा सैनिकांना सुगावा लागला होता... त्यामुळेच दहशतवाद्यांनी स्फोट घडवले... त्यात दोन सैनिक जागीच शहीद झाले... गंभीर बाब म्हणजे हे एकूण ८ दहशतवादी असून त्यांना पाकिस्तानने शस्त्रे पुरवली आहेत... त्यातील सहा दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आलंय... आठ पैकी चार दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे आहेत... या चकमकीनंतर सैनिकांनी दहशतवादी शोध मोहीम सुरूच ठेवली आहे... दरम्यान, सध्या राजौरीमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली...