कुंभमेळ्यात 1500 जणांना कोरोना, 50 लाख जणांचा कुंभमेळ्यात सहभाग, महामंडलेश्वरांचं कोरोनाने निधन
Haridwar Maha Kumbh 2021: हरिद्वारमध्ये सुरु असणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये दुसऱ्या शाही स्नान पर्वाची सुरुवात झाली आहे. या दिवसाचं औचित्य साधत मोठ्या संख्येनं साधू - संत गंगा नदीत स्नान करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच कोरोनाचं संकट असूनही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं इथं सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे.