Thane : ठाणे महापालिकेचं 1000 खाटांचं कोविड सेंटर तयार, डॉक्टर्स, नर्सेसविना कोविड सेंटर बंद

Continues below advertisement

ठाणे महानगरपालिकेकडे नवीन कोविड रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये जागाच उपलब्ध नाही. असे असताना पालिकेने उभारलेली रुग्णालये धूळ खात पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वोल्टास कंपनी च्या जागेवरील 1000 खाटांचे रुग्णालय रुग्णांच्या प्रतीक्षेत आहे. इथे असलेली अद्ययावत सामग्री, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड्स आणि इतर सर्व सोयीसुविधा गेल्या अनेक दिवसांपासून तयार करून ठेवले आहेत. मात्र त्यांचा वापर होत नाही. याची दोन कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे ऑक्सिजनचा होत नसलेला पुरवठा आणि दुसरे म्हणजे या ठिकाणी काम करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स चा असलेला तुटवडा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram