Political News : 'राजकारण केल्यास जशांच तसं उत्तर देऊ' - खा.डॉ. सुजय विखे-पाटील

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत आजही चर्चा होणार आहे. तरी, काल महाविकासआघाडी आणि इतर विरोधी पक्षांकडून झालेल्या टीकेला भाजप खासदार डॉ. सुजय विखेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. देशाला ओमायक्रॉनपेक्षा व्हायरल न्यूजचाच धोका असल्याचं सुजय विखेंनी म्हटलंय. महाराष्ट्रातील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना भारतरत्न दिला पाहिजे. त्यांनी लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढलं, पण एकही लस विकत घेतली नाही, अशी टीका सुजय विखेंनी केली. केंद्र सरकारवर टीका करताना आणि लोकसभेतल्या कालच्या चर्चेत एकाही लोकप्रतिनिधीचा अभ्यास दिसला नाही, असं म्हणत महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समाचार घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola