शिर्डीतील साई मंदिर सुरू न केल्यास उपोषण करणार, शिर्डीकरांचा इशारा, मंदिराला हजार कोटींचा फटका बसल्याचा दावा
Continues below advertisement
राज्यातील राजकीय नेत्यापासून ते नागरिकही आता मंदिरं खुली करण्याची मागणी करु लागले आहेत. देशातील अनेक धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी दिली असताना महाराष्ट्रात मात्र अद्यापही मंदिरांना कुलूप असल्यानं आता मंदिर उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिर्डीचे साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्यानं अर्थकारण जागेवर थांबलं असून साई मंदिर सुरू करण्याची मागणी वाढत असून सरकारने लवकर निर्णय घ्यावा व साई मंदिर सुरू करावे अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढाई सोबत आता उपोषण करावे लागले असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या 6 महिन्यात शिर्डीच एक हजार कोटींचे नुकसान झाले असून सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा साई संस्थानच्या माजी विश्वस्तांसह ग्रामस्थांनी दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Saibaba Temple Temples Maharashtra Lockdown Shirdi Temple Shirdi Saibaba Shirdi Lockdown Temple Reopen