Degree College Admission | मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात, पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
Continues below advertisement
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर 16 जुलै रोजी जाहीर झाला, राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता. आता निकालानंतर पुढचं पाऊल म्हणजे डिग्री कॉलेज म्हणजेच पदवी प्रवेश प्रक्रिया, आता लॉकडाऊन असल्या कारणाने नव्या कॉलेजची सुरुवात ऑनलाईनच होणार असून उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पदवी प्रवेशाचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
Continues below advertisement