ABP News

CM on Mundhe | तुकाराम मुंढे सर्वपक्षीयांच्या रडारवर, मुख्यमंत्री ठाकरेंकडून मात्र मुंढेंचं कौतुक

Continues below advertisement
नागपूर : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरकरांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला असला तरी नागपुरात महाविकास आघाडीतील काही नेत्यांना मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य शंभर टक्के पटलेले नाही. काहींनी मुख्यमंत्र्यांना या विषयी नाण्याची एकच बाजू माहीत असून आम्ही त्यांना नाण्याची दुसरी बाजूही लक्षात आणून देऊ असे म्हटले आहे. तर काहींना मुंढे आधी अनेक जनहिताच्या कामांना सरळ नाही म्हणायचे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्याबद्दल नाराज असायचे, आता मात्र मुंढे यांची कार्यपद्धती हळू हळू बदलत असून लोकप्रतिनिधींची त्यांच्या बद्दलची नाराजी दूर होत असल्याचे वाटत आहे. त्यामुळे मुंढे यांना मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यानं तरी नागपुरात सुरु असलेले राजकारण लवकर संपण्याची चिन्हे नाहीत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram