Nagpur Mayor on CM | ठाकरे तुकाराम मुंढेंचे नव्हे, जनतेचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी मुंढेंना समज द्यावी - संदिप जोशी

उद्धव ठाकरे हे जरी मनपा आयक्त तुकाराम मुंढे यांच्या सोबत असल्याचे सांगत असले तरी आमची त्याला हरकत नाही, मात्र उद्धव ठाकरे हे फक्त तुकाराम मुंढे यांचे मुख्यमंत्री नाहीत तर ते आमचेही मुख्यमंत्री आहेत. जनतेचेही ते मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे असं मत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले आहे. सामना वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर नागपुरात विविध पक्षीय नेत्यांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola