Gajanan Maharaj Palkhi Buldhana : संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

Continues below advertisement

पंढरीची वारी.....लागलीया आस....!

संत गजानन महाराजांची पालखीचं आषाढी वारीसाठी शेगाव येथून पंढरपूर कडे प्रस्थान.

१५ जुलै रोजी पालखी पोहचणार पंढरपूर येथे.

सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखीचं शेगाव येथून पंढरपूर साठी प्रस्थान होत आहे.  यंदा दिंडीचे हे ५५ व वर्ष आहे. जवळपास ७०० वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं  प्रस्थान होत आहे. या दिंडीत ७०० वारकरी , २५० पताकाधारी २५० टाळकरी २०० सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी मंदिरातून प्रस्थान होत आहे ...तर पुढील एक महिना दोन दिवस पायी प्रवास करून १५ जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे . पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत . आषाढी सोहळा संपल्यावर पालखी २१ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघून ११ ऑगस्ट रोजी शेगावात पोहचेल.

आज  पालखी प्रस्थान सोहळ्याला नवं नियुक्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव  उपस्थित  आहेत.गण गण गणात बोते च्या गजरात व हजारो भक्तांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा संपन्न होत आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram