
Sanjay Raut on Dombivli MIDC Fire : थेट शिंदेंवर हफ्तेखोरीचा आरोप,एमआयडीसीतील आगीवरुन राऊतांचा हल्ला
Continues below advertisement
डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivili Fire) एका कंपनीत पुन्हा एकदा मोठी आग लागली आहे. स्फोटांचे आवाज येत असल्याने डोंबिवली हादरली आहे. यामुळे रहिवाशांमधे घबराट निर्माण झाली आहे. डोंबिवलीत पुन्हा आग लागल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. डोंबिवलीतील कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा. या ज्या घटना होतायत त्यांच्याकडे लक्ष द्या, असे राऊत बोलत होते. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, संपूर्ण एमआयडीसीमधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील. एमआयडीसीमध्ये बेकादेशीर कामे सुरू आहेत. पोलिसांपासून शिंदेंच्या लोकांपर्यंत लाखो करोडोंचे हफ्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून घ्या.
Continues below advertisement