ABP News

Kishori Pednekar | BMC कर्मचाऱ्यांची अॅक्सिसमधील खाती राष्ट्रीयीकृत बँकेत वळवण्याचा विचार : महापौर पेडणेकर | ABP MAJHA

Continues below advertisement
मिसेस फडणवीस आणि शिवसेनेमधल्या राजकीय कलगीतुऱ्यांमुळं अडचणीत आलेल्या अॅक्सिस बँकेला अजून एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  ठाण्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेचाही कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवण्याचा विचार सुरु आहे, तशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ठाणे महानगरपालिकेच्या निर्णयाबद्दल वाचलं. महापालिकेत असा निर्णय करायचा असेल तर आमचे गटनेते आणि सर्व नेत्यांची चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर आमचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे त्या म्हणाल्या. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram